ट्रिपल तलाकवर काय आहेत विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ?

ट्रिपल तलाकवर काय आहेत विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ?

सर्वाच्च न्यायालयाच्या तिहेरी तलाकसंबंधी  निर्णयाचं केंद्र सरकारने स्वागत केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिलासा देणारा असल्याचं सांगितलं आहे.

‘तिहेरी तलाकवरील बंदीने मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क दिला असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.

सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकवर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील स्वागत केले. तिहेरी तलाकवरील बंदीमुळे मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कांचा विजय झाला असून ही नवीन पर्वाची सुरुवात असल्याचे अमित शहांनी म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आदर करतो, पण या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आव्हानत्मक असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टाने मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार दिला असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीदेखील निर्णयाचे स्वागत केले.

 

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीेही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. हा ऐतिहासिक निर्णय आहे, केवळ न्यायच नव्हे तर यामुळे सशक्तीकरण देखील प्रदान करतो.

 

काय आहे ट्रिपल तलाक प्रकरण ?
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आफ्रीन रेहमान, गुलशन परवीन, इश्रात जहान आणि अतिया साबरी या मुस्लीम महिलांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवत याचिका दाखल केली होती.

COMMENTS