रिक्षाचालकांनी आज पुकारलेल्या सपांचा ठाणेकरांना मोठा फटका बसत आहे. सकाळच्या घाईत अनेकांना ठाणे स्टेशन चालत गाठण्याची वेळ आली. रिक्षाचालक बुधवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेल्याने ठाणेकरांचे हाल सुरू झाले आहेत.
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकाविरोधात कारवाई केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. तसंच दहा दिवसांआधी गावदेवी आणि स्टेशन परिसरात कारवाईच्या वेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
रिक्षाचालक आणि आयुक्तांमध्ये वाद सुरू आहे त्याचा फटका सर्वसामान्यांना होताना दिसत आहे. रिक्षाचालकांच्या संपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांवर पडत आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर टीएमटी प्रशासन अधिकाधिक बसेस रस्त्यावर उतरवणार आहे.
COMMENTS