‘आमचं सरकार असताना उसासाठी टप्प्या टप्प्याने ठिंबक सिंचन व्हावं असं आमचा प्रयत्न होता. सरकारने आज जे निर्णय घेतला त्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनसाठी अनुदान द्यावे तेही तात्काळ. असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार म्हणाले की, ‘काही दिवसात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनात आम्ही जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्यांना हात घालू. कर्जमाफीबाबत अद्याप काही स्पष्टता नाही हा विषय आम्ही सभागृहात घेऊ. सरकारकडे जर पैसे नसेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेडून मदत घ्यावी. महिलांवरील अत्याचार, विनयभंग अशा घटना वाढत चालल्या आहेत. विक्रुतांना भीती राहिली नाही. कोपर्डी घटनेत जर आरोपी शिक्षा झाली असती तर एक धाक विक्रुतांना असला असता. गेली 25 वर्षे शिवसेना ठाण्यात सत्तेत आहेत मात्र अजूनही ठाण्यात लोडशेडिंगचा त्रास आहे. सरकारतर्फे कोणतंच नियोजन केलं जात नाही हे या सरकारचं अपयश आहे’.
मुंबईत पाऊस जास्त पडतो त्याला बीएमसी जबाबदार कशी ?, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते त्यावर अजित पवार की , मुंबई महानगरपालिकेने योग्य नियोजन करायला हवे पाऊस तर पडणारच, रेल्वे सेवा, रोड सेवा ठप्प व्हायला नकोत याची जबाबदारी मनपाने घ्यायला हवी. नवी मुंबईत कधी रस्त्यावर खड्डे पडलेत का ? पावसामुळे रेल्वे सेवा बंद पडली का ? तसं नियोजन मनपाने करावं.
COMMENTS