जवळपास दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची केंद्र सराकारच्या ताब्यात असलेली जमीन अखेर आज राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, केंद्रीय वस्त्रोज्ञोगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्य मंत्रीमंडळातील मंत्री यांच्या उपस्थितीत जमीन हस्तांतरणाचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर काही दिवसांमध्ये या स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पाच वर्षांपूर्वी केंद्रातील व राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण म्हणजे साडेबारा एकर जमीन देण्याची घोषणा केली. त्यानंतर त्या जमीनीवरील उद्योगाचे आरक्षण उठविण्यापलीकडे सरकारने पुढे फार काही केली नाही. त्यानंतर राज्यात व केंद्रातही सत्तांतर झाले. केंद्रातील भाजप सरकारने ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमीपूजनही केले. परंतु राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून (एनटीसी) ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात मिळण्याचा प्रश्न तसाच भिजत पडला होता. त्याला दोन वर्षानंतर मुहुर्त मिळाला असून आता सरकार प्रत्यक्ष स्मारकाचे काम कधी सुरू करते याकडे लक्ष लागलंय.
COMMENTS