डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

मुंबई – बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 29 ऑगस्टला मुंबईत पडलेल्या मुसळधार प्रवासात मुंबई जलमय झाली होती. पाणी जाण्यासाठी गटाराचे झाकण उघडण्यात आले होते. ते न दिसल्याने त्यात डॉक्टर अमरापूरकर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी वरळीच्या कोळीवड्यात सापडला होता.
याप्रकरणी दादर पोलिसांनी परळमध्ये राहणाऱ्या चौघांना अटक केली आहे. सिद्धेश भेलसेकर (२५), राकेश कदम (३८) त्याचा भाऊ निलेश आणि दिनार पवार (३६) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. , या चौघांना शनिवारी अटक करण्यात आली असून, त्यांना भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांनी मॅनहोलचे झाकण उघडले होते. पावसामुळे त्यांच्या घरात पाणी येत होते, ते घालवण्यासाठी त्यांनी मॅनहोलचे झाकण हटवल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितले, की आम्ही परिसरातील अनेकांची चौकशी केल्यानंतर, या चौघांनी घरात पाणी घुसू नये म्हणून, सेनापती बापट मार्गावरील सुपर्श इमारतीजवळचे मॅनहोल उघडल्याचे समजले. त्यांना झाकण उघडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. शिवाय त्यांनी कोणताही सूचना फलक लावला नव्हता, त्यामुळेच त्या चौघांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

COMMENTS