मुंबई – ‘नशीब, डोकलामचा विषय संपला, नाहीतर डोकलाम आणि उत्तर कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील, असे ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठावर खोचक टीका केली आहे.
बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं कारण विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात दिले आहे. मुंबई विद्यापीठाने दिलेली निकालाची तारीख पुन्हा चुकविली आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या कारभावार टीका केली आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाने निकालासाठी 19 सप्टेंबर ही नवी तारीख दिली आहे. निकालाची डेडलाईन लेखी स्वरूपात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विद्यापीठाला दिले आहे.
नशीब, Doklam चा विषय संपला. नाहीतर doklam आणि North Korea च कारण देखील उशीर झाला म्हणून देतील. #निकाल_बंदी https://t.co/JFRKSCBmY1
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 6, 2017
COMMENTS