मुंबईमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. जीएसटीसाठी येत्या 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. जीएसटीच्या मुद्द्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. मात्र, महापालिकेची स्वायत्ता अबाधित राहावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
जीएसटी संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे. ‘जर लाचार होऊन महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल. सुरूवातीपासून आमची हिच मागणी आहे की महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं रहावं लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल.’ असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.
COMMENTS