मुंबई – ‘ पिक विम्याची मुदत वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, नाही झाला तर मी स्वतः दिल्लीला जाऊन मुदत वाढवून आणू’. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, पिक विम्याची रांगेत मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत देऊ. विमा कंपन्यांबरोबर जो करार झाला त्यात 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. 5 आॅगस्ट पर्यंत मुदत वाढवून देण्याचा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवला आहे. मी स्वतः तीन वेळ केंद्रीय कृषिमंत्र्यांशी बोललो आहे. आज संध्याकाळपर्यंत मुदत वाढ मिळाली नाही तर मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन धरणे धरू.
दरम्यान, धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या मनोरा आमदार निवासातील खोलीचं छत कोसळल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आमदार निवासातील अनुभव मलाही आहे. मनोराचं बांधकाम चुकीच आहे. आमदार निवास पाडून नवीन बांधणार आहे. आपण पर्यायी व्यवस्थेचे सगळे पर्यायाचा विचार करू. त्या सगळ्या पर्यायांचा विचार करून निर्णय घेऊ’. असं मुख्यमंत्री स्पष्टीकरण दिले आहे.
COMMENTS