… तर राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये विधानसभेच्या 50 जागा लढवणार – प्रफुल्ल पटेल

… तर राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये विधानसभेच्या 50 जागा लढवणार – प्रफुल्ल पटेल

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या 40 ते 50 जागा स्वबळावर लढवले असं पक्षाचे गुजरात प्रभारी प्रफुल्ल यांनी सांगितलं आहे. गुजरातमध्ये 181 जागांवर जवळपास 400 उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे अशी माहितीही पटेल यांनी दिली आहे.

गुजरातमधी राज्यसभेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या गुजरातमधील 2 पैकी एका उमेदवाराने भाजपला मतदान केल्यानं पक्षात वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बेठकीलाही शरद पवार यांनी दांडी मारली होती. त्यामुळे दोन्ही पक्षात वाद आहे. त्या पार्श्वभूमीवर काल प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात निवडणुकीबाबत बैठख घेतली. काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी उत्सुक आहे. मात्र त्यांनी हात पुढे केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर 50 जागा लढवेल असंही पटेल यांनी सांगितलं. आता काँग्रेसचे पटेल आणि राष्ट्रवादीचे पटेल यांच्यात दिलजमाई होते का की दोन पटेल आणि शहा यांच्यात तिरंगी सामना होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

COMMENTS