….तर संजय दत्तची पुन्हा होऊ शकते कारागृहात रवानगी

….तर संजय दत्तची पुन्हा होऊ शकते कारागृहात रवानगी

मुंबई – संजय दत्तच्या शिक्षेत सूट देताना नियमभंग झाल्याचे हायकोर्टाला वाटत असेल तर त्याला पुन्हा तुरुंगात पाठवले जाऊ शकते, असे स्पष्टीकरण आज राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिले आहे. तुरुंगात परतल्यानंतर दोन महिन्यातच संजय दत्तला एकाच वेळी फर्लो आणि पॅरोल कसा देण्यात आला, असा प्रश्न यावेळी हायकोर्टाने उपस्थित केला आहे. त्यामुळे संजय दत्तच्या अडचणी वाढू शकतात. 

मुंबईमध्ये झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र त्याची शिक्षा पूर्ण होण्यास आठ महिने शिल्लक असतानाच त्याची सुटका केली गेली. ही शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सुटका का केली, असा प्रश्न उपस्थित करत पुण्यातील प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने संजय दत्त सुटकेप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

 

COMMENTS