निवडणूक निर्वाचन आयोगाने तमिळनाडूमधील आरके नगर येथील होणारी विधानसभेची पोटनिवडणूक रद्द केली आहे. येथील नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटल्याच्या कारणाने हा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे.
येथे 12 जागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. जयललिता यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु मतदारांना पैसे, सोयीच्या वस्तू वाटण्याच्या घटना लोकशाहीच्या प्रक्रियेला काळिमा फासणाऱ्या आहेत. यामुळे येथील पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.
तमिळनाडूच्या निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठक घेण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, काही वस्तू वाटण्याच्या घटना बंद झाल्यानंतरच येथे निवडणूक घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
COMMENTS