तुकाराम मुंढेंचा धडाका;  उशिरा येणा-या 117 कर्मचा-यांचा पगार कापला

तुकाराम मुंढेंचा धडाका; उशिरा येणा-या 117 कर्मचा-यांचा पगार कापला

पुणे – पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आज दुस-याच दिवशी कामावर उशिरा येणा-या 117 कर्मचा-यांवर कारवाई करत त्यांचा एका दिवसाचा पगार कापला आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी कालच कर्मचा-यांची बैठक घेऊन शिस्तप्रियतेबाबत सक्त ताकीद कर्मचा-यांना दिली होती. तसेच शिस्तभंग केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कर्मचा-यांना दिला होता. त्यात कोणत्याही कर्मचा-याने इतर ऑफिसमध्ये कामाशिवाय जाऊ नये. त्यात प्रामुख्याने चहा घेण्यासाठी इमारतीच्या बाहेर न जाता कॅन्टीनचा वापर करा, धूम्रपान करता कामा नये. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचप्रमाणे जीन्स व टी शर्ट न घालण्याची ताकीदही दिली होती.

COMMENTS