एन. रामास्वामी यांनी आज नवी मुंबई महापालिका आयुक्ताचा पदभार तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत स्वीकारला. मुंढे साहेबानी जे काही चांगलं काम केले आहे ते पुढे नेणार. लोकांना विश्वासात घेऊन काम करणार. अशी प्रतिक्रिया पदभार स्वीकारल्यानंतर एन. रामास्वामी यांनी दिली.
बेकायदा बांधकामांच्या विरोधात हातोडा उचलणारे नवी मुंबईचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली, त्यांच्या जागी आता एस. रामास्वामी यांनी आयुक्ताचा पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुंढे यांच्याविरोधात नवी मुंबई महापालिकेने अविश्वास ठराव पारित केला होता. तेव्हापासून मुंढे हे चर्चेत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली टाळली होती. मात्र त्यांची बदली आता झाली आहे.
दरम्यान, नवी मुंबईचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली संदर्भात सोशल मीडियावर नेटीझन्स आणि नवी मुंबईकरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे? तुकाराम मुंढे यांची बदली तडकाफडकी का करण्यात आली यांचं आम्हाला उत्तर द्या असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
नवी मुंबईत अनेक समस्या तुकाराम मुंढे यांनी सोडवल्यामुळे ते अतिशय लोकप्रिय झाले होते. नवी मुंबईतील भूमाफिया, अनिधिकृत बांधकाम, ठेकेदार आणि गैरकारभाराला सहकार्य करणा-या महापालिकेतील अधिका-यांविरोधात आयुक्त तुकारम मुंढे यांनी धडाकेबाज कामगिरी केली. आणि यामुळे आता त्यांची राज्य सरकारने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
तुकाराम मुंढेंच्या बदलीमुळे राज्य सरकारच्या पारदर्शकतेच्या मुद्यावर बोट दाखवली जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचा विचार केला आहे. यासाठी नवी मुंबईकरांनी पिटिशिअन दाखल केली आहे.
# आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आम्हाला ही माहिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
# तुकाराम मुंढे यांची तीन वर्ष पूर्ण देखील झाली नाहीत आणि त्यांची बदली केली. 1 वर्ष देखील त्यांना काम करण्यास परवानगी का दिली नाही? अशी तडकाफडकी का बदली केली?
# तुकाराम मुंढेच्या कामाने जर नागरिक खूष होते तर त्यांची अशी बदली का केली?
# नवी मुंबई महानगरपालिकेत जर मतदान करण्याची तरतूद असेल तर सरकारने याबाबत विचार करावा आणि त्यापद्धतीने लोकांना आपलं मत व्यक्त करण्याची संधी द्यावी.
# सगळ्यांनी पिटिशियनवर सही करून आपलं मत नोंदवावं अशी माहिती सॉफ्टवेअर इंजिनिअर वैभव गोडांबे याने दिली आहे.
COMMENTS