पुणे – पुण्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मुंढेंसारखे अधिकारी नकोत अशी मागणी आता होत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकर यांनी सरकारकडे मुंढे यांना परत बोलावण्याची मागणी केलेली आहे. पालिकेशी संबंधित महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांची बैठक होती, या बैठकीला मात्र आयुक्त तुकाराम मुंढे अनुपस्थित राहिले. आणि त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवले. यायचे नव्हते तर त्यांनी तसे अगोदरच बैठकीचे कबुल करायला नको होतो. असे देखील मुक्ता टिळक म्हणाल्या.
महापौर आणि नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.हा सगळा प्रकार मानापमानाचा ठरला असल्याची देखील चर्चा आहे. आयुक्तांना बैठकीची कल्पना देण्यात आली होती, त्यांनी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं होतं, असं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं पण ते ऐन वेळेस आले नाहीत, त्यांनी इतर अधिकाऱ्यांना पाठवून दिलं, यामुळे निर्णय होवू शकले नाहीत. तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेप्रमाणे, पुण्यातही शिस्तीने प्रशासन चालवताना दिसत आहेत, यावरून देखील अशा प्रकारचे वाद वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.
या सगळ्या प्रकारावरून पुन्हा एकदा तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यात तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार आता नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS