तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या निर्णयाची होणार चौकशी

तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या निर्णयाची होणार चौकशी

मुंबई –  माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची  चौकशी केली जाणार आहे. तुकाराम मुंढे यांनी मनमानी करत निर्णय घेतले आहे असा सूर महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांचा असून घेण्यात आलेल्या निर्णयांची कायदेशीर वैधता तपासण्यासाठी 15  सदस्य  चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. आजच्या महासभेत असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

मे 2016 मध्ये तुकाराम मुंढे यांची नियुक्ती  करण्यात आली त्यावेळी  त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत घेतलेले निर्णय न्यायालयाने स्थगित केले आहेत. यामध्ये एपीएमसीतील व्यापाऱ्यांवर केलेली कारवाई, सीबीडीतील दोन पेट्रोलपंपावर केलेली कारवाई, डी. वाय. पाटील रुग्णालय किंवा पालिका कर्मचाऱ्यांविरुद्ध काढलेले आदेश यांना न्यायालयाने केराची टोपली दाखवली आहे. तसेच, वाशीतील इनऑर्बिट मॉलमधील हायपरसिटी मॉलच्या बेसमेंटमधील गाळे सील करण्याच्या कारवाईविरुद्धही न्यायालयाने पालिकेचे वाभाडे काढले होते. तसेच, सर्वसाधारण सभेला अंधारात ठेवून मुंढे यांनी महापालिकेचा आकृतीबंध सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामुळे  मुंढे यांनी आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची चौकशी होणार आहे.

 

 

COMMENTS