‘तुमचे अन्न भूकेल्याच्या तोंडी’; मुंबईच्या डबेवाल्यांचा अनोखा उपक्रम

‘तुमचे अन्न भूकेल्याच्या तोंडी’; मुंबईच्या डबेवाल्यांचा अनोखा उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अन्न बचाव घोषणेच्या पाश्वभुमीवर वार्षीक 15 हजार करोड रूपयांचे फुकट जाणारे अन्न वाचविण्याचा अनोखा संकल्प मुंबईच्या डबेवाल्यांनी केला आहे. 125 करोड लोकसंख्येच्या आपल्या  भारत देशाची अन्न ही मुलभुत आंणि प्राथमिक गरज आहे. कुपोषण आणि भूकबळीने भारतात हजारो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असतात. असंख्य मुद्दे याला कारणीभूत असले तरी मुख्य मुद्दा आपली मानसिकता याला कारणीभूत आहे. आणि ती बदलणे ही आज काळाची गरज आहे.

 

दरवर्षी, आपण अंदाजे 15 हजार करोडहून जास्त रुपयांचे खाण्यायोग्य अन्न वाया घालवतो अथवा फेकुन देत असतो. विशेषतः लग्न समारंभ, सामाजिक-धार्मिक समारंभ, हॉटेल, ऑफिस, शाळांची कॅटीन, रस्त्यावरील खाद्यपदार्थांची दुकाने, फूडमॉल, धार्मिक विधी, विक्री न झाल्यामुळे(expiry date) संपुष्टात आलेले अन्न अशी असंख्य कारणे अन्नाच्या नासाडीसाठी कारणीभूत असतात.

 

खाण्यायोग्य अन्न वाचविणे, ते कमितकमी वेळात गरजू व्यक्तींना पोहोचवणे, ही काळाची गरज ओळखून मुंबईतील डबेवाल्यांनी रोटी बॅंक इंन्डीया ही अभिनव मोहीम सुरू केली आहे. हया कामात वाया जाणारे अन्न डबेवाला गोळा करून भुकेल्यांना नेऊन वाटतो. या कार्यात मुंबईचे शेकडो डबेवाले बांधव आनंदाने सहभागी झाले आहेत.कोणताही मेहनाताना अथवा मोबदला न घेतां हे काम आनंदाने ते करतात. ड़िसेंबर 2015पासून सुरू झालेल्या हया समाज कार्यात, जवळजवळ 300 गरजूंना दररोज मोफत अन्न पुरवठा केला जातो. डबेवाल्यांनी आतापर्यंत अंदाजे सुमारे 30 लाख रुपयांचे अन्न वाचवून लोकांना खाऊ घातलंय आहे. विचार करा, शेतात बियाणे रूजवण्यापासून ते रूचकर डिश आपल्यासमोर येईपर्यंत आपल्या देशाचे किती रूपये, मनुष्यबळ, ईंधन खर्ची पडले असणार? त्याकरिता प्रत्येक नागरिकाने अन्नाचा अपव्यय टाळावा.

 

“प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो ‘एकाच वाया, दुस-याच्या उपयोगा’ याच उद्देशातून डबेवाल्यांनी एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम चालू केला आहे. तुमच्या घरात/समाजात आनंद सोहळा असतो, त्याला आपण अनेकांना आमंत्रण देतो, त्यातून अन्नदानही करतो पण खरंच तुम्हाला त्या अन्नदानच पुण्य मिळत का? कारण आलेली आमंत्रीत मान्यवर पोटातल्या भुकेपेक्षा ताटात जास्त घ्यायचं, खपलं तर ठीक अन्यथा फेकून द्यायचं. अशाने अन्नाचा अपमान तर होतोच पण खाणा-याला आणि देणा-यालाही आनंद मिळू शकत नाही. तरीही सर्वांच खावून झाल्यवर काही अन्न उरतच कारण अन्न हे नेहमी ‘कमी नको यायला’ या उद्धेशाने येणा-या माणसांच्या संखेपेक्षा जास्तच बनवलं जातं…! मग हे जास्तीच अन्नाचं आपण काय करतो काय? तर शेवटी फेकून देतो. या वाया जाणा-या अन्नाच्या नासाडीला उपयोगात आणावं याचं उद्देशाने ‘तुमचं अन्न भूकेलेच्या तोंडी’. अन्न राहिलं तर आम्हांला फोन करा आम्ही ते अन्न तुमच्याकडून घेवून अशा लोकांच्या मुखी लावू ज्यांना त्याची खरी गरज आहे. यामुळे अन्नाची नासाडी वाचेल आणि त्या भूकेलेल्यांच्या हृदयातून जो तृप्तीचा आशीर्वाद निघेल त्यानेच ख-या अर्थाने पुण्याचा एखादा थेंब आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही”.

सुभाष तळेकर, प्रवक्ता

मुंबई डबेवाला असोशिएशन, मो. 9867221310

COMMENTS