तुम्हाला कोणी जर त्रास देत असेल तर सरळ त्याच्या थोबाडीत मारा, असं आवाहन भाजप खासदार पुनम महाजन यांनी केलं आहे. अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या एका संमेलनात आयोजित ‘ब्रेकिंग द ग्लास सिलिंग’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.
माझ्यासह प्रत्येक महिला कधी ना कधी लैंगिक अत्याचाराची बळी पडलेली आहे, जेंव्हा माझ्याकडे कारने जायला पैसे नसायचे. तेंव्हा मी वरळीवरून वर्सोवाला क्लासला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करायचे, असं सांगून त्या म्हणाल्या की, अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर स्वत:ला कमकुवत समजू नका. अशा प्रकारच्या परिस्थितीशी सामना केलेल्या अनेक महिला आहेत. विशेष म्हणजे भारतात तर खूपच आहेत. असं त्या म्हणाल्या.
भारतातील महिला अमेरिकेती महिलांपेक्षा अधिक प्रगती केली आहे. अमेरिकेत अजून पर्यंत महिला राष्ट्रपती झालेली नाही. आपल्याकडील मात्र महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्रीपदासह सर्व पदावर पोहचल्या आहेत. असेही त्या म्हणाल्या.
COMMENTS