9 महिन्यात नेता होण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असलेल्या रामभाऊ म्हाळगी या संस्थेने अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘इंडियन इन्सिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशीप’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. बुधवारी या अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला. या अभ्यासक्रमाचे शूल्क हे तब्बल अडीच लाख रूपये इतके आहे. मुंबई नजीक असलेल्या या संस्थेत हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
पदव्युत्तर पदवी स्तराच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांना नेता होण्याबरोबरच राजकारण, प्रशासन आणि जनतेशी निगडीत प्रकरणांचे शिक्षण दिले जाणार आहे. 9 महिन्यांच्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये 32 लोकांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये एमबीए ते आयआयटी पास युवक आणि उद्योगपतींच्या मुलांचा समावेश आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे महाराष्ट्रातील असून त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगालसह मध्य प्रदेशातील विद्यार्थी नेता होण्यासाठी या संस्थेत प्रवेश घेतला आहे.
COMMENTS