एखाद्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत पत्रकाराला घ्याची असेल तर त्याच्या विषयी सर्व माहिती मिळवणे आवश्यक आहे. नाही तर काही वेळा नामुष्कीला सामोरे जावे लागते. असाच एक अनुभव आला ते अमेरिकेतील पत्रकार मेगन केली हिला. मेगन यांनी चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘तुम्ही ट्विटरवर आहात का?’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी मोदींनी त्यांना हसून ‘हो’ असे उत्तर दिले.
एखाद्या पंतप्रधानांची मुलाखत घेताना पत्रकाराने एखादी गोष्ट माहिती नसताना ती समोरच्या व्यक्तीला विचारणे म्हणजे हास्यास्पद बाब आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुक, ट्विटवरसह सोशल मिडिया साईटसवर अत्यंत सक्रिय आहे. त्यांचे फेसबुक आणि ट्विटरवर जवळजवळ 30 मिलियन फॉलोअर्स आहेत. तरीही मेगन केली यांनी मोदींना विचारले, की तुम्ही ट्विटरवर सक्रिय असता का? असा प्रश्न केल्यानंतर या महिला पत्रकाराला ट्विटरवर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. मेगन केली या रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतीन यांची त्यांच्या नवीन एनबीसी कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यासोबत उपस्थित होते. या मुलाखतीचा व्हिडिओ या चॅनलने प्रसारीत केला आहे. त्यात तिने मोदींना तुम्ही ट्विटरवर आहात का? असा प्रश्न विचारला. मेगन केलीने मोदींनी विचारलेल्या या प्रश्नावरुन सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया व मेगन केलीची खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्या माणसाचे ट्विटरवर 30 मिलीयन फॉलोअर्स आहेत, त्यांना असा प्रश्न विचारणे म्हणजे अज्ञानपणाचे लक्षण असल्याचे अलयसा अय्यर यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
COMMENTS