तुळजाभवानी मंदिरात विश्वस्तांनाच नो एन्ट्री !  

तुळजाभवानी मंदिरात विश्वस्तांनाच नो एन्ट्री !  

तुळजापूर – तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे. स्थानिक आमदार हे देवस्थान ट्रस्टचे विशस्वस्त असतात. मंदिरातील सुरक्षा तसेच इतर सोयी सुविधा तपासणे, त्या करून घेण्याची जबाबदारी विस्वस्तांची असते. याच अनुशंघाने तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास मंदिरात जात होते. परंतु, तेथील एका पोलिस अधिकाऱ्यांने त्यांना मंदिरात जाण्यापासून मनाई केली. मधुकरराव वयाने ज्येष्ठ आहे. त्यांनी वयाची 75 गाठली आहे. त्यांनी पोलीस अधिका-याला आपण आमदार असल्याचं सांगूनही त्याने आतमध्ये प्रवेश दिला नाही. गुरुवारी मंदिरात जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक होते. आमदार हे मंदिराचे विस्वस्त आहेत. त्यांना जावू द्या, अशी विनंतीही त्यांच्या सहायकांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली. परंतु, तो अधिकारी ऐकायला तयार नव्हता. दरवर्षी पोलिस अधिकारी, मंदिर संस्थानचे खासगी सुरक्षा रक्षक बेजाबबदारपणे वागून भाविकांसह इतरही नागरिकांची चांगलीच डोकेदुखी करीत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. गुरुवारी तसाच प्रकार घडला. अखेर एका अधिकाऱ्याने यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलिसांची अरेरावी पहायला मिळाली. त्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर आमदार चव्हाण यांनी घडलेल्या प्रकार दुजोरा दिला असून याबाबत आपण अध्यक्षांकडे तोंडी तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS