मुका मोर्चा’ व्यंगचित्रामुळे शिवसेना विरुद्ध मराठा समाज असा ‘सामना’ रंगलाय. अखेर हा वाद मिटवण्यासाठी ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. ‘ते’ व्यंगचित्र शिवसेनेची भूमिका नाही आणि सामनाचीही नाही. ज्या व्यंगचित्राने हे व्यंगचित्र काढले तो एक सदरचा भाग होता. कोणत्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता असं म्हणत शिवसेनेनं हात झटकले आहे. तसंच बुलडाण्याच्या आमदार आणि खासदारांचीही मनधरणी करण्यात आली असून राजीनामास्त्र अखेर हे पेल्यातलंच वादळ ठरलंय.
COMMENTS