तोंडी तलाक असंवैधानिक ठरवल्यास विवाह आणि घटस्फोटा संदर्भात नवा कायदा करू, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. तोंडी तलाकवर गेल्या तीन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी आणखीन सात दिवस चालणार आहे.
अॅटॉर्नी मुकूल जनरल रोहतगी यांनी तोंडी तलाकबद्दलची केंद्र सरकारची भूमिका यावेळी स्पष्ट केली. ‘न्यायालयाने तोंडी तलाक रद्द केल्यास सरकार मुस्लिमांमधील लग्न आणि घटस्फोटांचे नियमन करण्यासाठी कायदा करेल,’ असे अॅटॉर्नी जनरल रोहतगी यांनी सांगितले. तोंडी तलाकमुळे मुस्लिम महिलांना त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या मुलभूत हक्कांवर यामुळे गदा येते, असे रोहतगी म्हणाले.
‘वेळ अतिशय मर्यादित असल्याने एकाचवेळी तिन्ही बाबींवर सुनावणी घेणे शक्य नाही. भविष्यात निकाह हलाल आणि बहुपत्नीत्व या दोन मुद्यांवर सुनावणी घेतली जाईल,’ असे मुख्य न्यायाधीश खेहर यांनी सांगितले.
न्यायालयाकडून तोंडी तलाकच्या मुद्यावर विशेष सुनावणी घेतली जात आहे. यासाठी न्यायाधीश सुट्टीच्या कालावधीतही कामकाज पाहात आहे. न्यायालयाने यासाठी स्थापन केलेल्या खंडपीठात पाच धर्मांच्या पाच न्यायाधीशांचा समावेश आहे.
COMMENTS