मुंबई – शेतक-यांच्या नावावर तीनशे कोटींपेक्षा जास्त कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली उद्योगपती आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांना काल अटक करण्यात आलीय. मात्र हा घोटाळा सव्वातीनशे नाही तर 650 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. यामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांची फसवणूक झाल्याचाही आरोप मुंडेंनी केलाय. आपण या बद्दल तक्रार केली होती. मात्र सरकारनं त्याची दखल घेतली नाही. रत्नाकर गुट्टे हे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करतात ते पहायचं आहे असंही मुंडे म्हणाले. या प्रकरणाची ईडी किंवा सीबीआयमार्फेत चौकशी करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
असा घोटाळा झालाच नाही – गुट्टे
परभणी- असा काही घोटाळा झालाच नाही, राजकीय षडयंत्रातून माझ्यावर आरोप करण्यात आल्याचा दावा रत्नाकर गुट्टे यांनी केलाय. गुट्टे यांची आज परभणीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयात तब्बल सव्वा तीन दास चौकशी झाली.
COMMENTS