‘त्या’ शेळीने मालकालाच लावला 66 हजारांना चुना !

‘त्या’ शेळीने मालकालाच लावला 66 हजारांना चुना !

कन्नोज (उत्तर प्रदेश) – शेतकरी बांधवांनो तुम्ही शेळीपालन करत आहात का ? असाल तर सावधान !  कारण उत्तर प्रदेशातल्या ‘त्या’ शेळीसारखी एखादी शेळी तुमच्याकडेही असू शकते. उत्तर प्रदेशातल्या कुमार पाल या शेतक-याला त्या शेळीच्या करामतीमुळे डोक्याला हात लावून घेण्याशिवाय काहीही उरलं नाही.

त्याचं झालं असं कुमार पाल आज सकाळी अंघोळ करत होता. त्यानं त्याची पँन्ट काढून बाहेर ठेवली होती. त्या पँन्टच्या पॉकेटमध्ये तब्बल 66 हजार रुपये होते. 2 हजाराचाच्या 33 नोटा होत्या. त्या शेळीला कागद खाण्याची सवय होती. तिने त्याच्या पँन्टमधील ते पॉकेट ओढून बाहेर काढले. आणि त्याच्यातल्या तब्बल 31 नोटा फस्त केल्या. अंघोळ झाल्यानंतर कुमार पाल हा बाहेर आला तेंव्हा त्याला शेळीकडे बघून धक्काच बसला. उरलेल्या दोन नोटा शेळी चघळत होती. त्या त्याने कशाबशा वाचवल्या. मात्र त्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे त्या कोणी घेईल का ही शंका आहेच. पोटच्या लेकराप्रमाणं जपलेल्या शेळीनेच असा चुना लावल्यामुळे कुमार पाल यांना हळहळ व्यक्त करण्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही. त्यांनी घराच्या बांधकामासाठी विटा आणण्यासाठी ते कष्टाचे पैसे जमवले होते.

COMMENTS