थोडाफार भ्रष्टाचार चालेल, मोठा घोटाळा करु नका, भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचे धक्कादायक विधान !

थोडाफार भ्रष्टाचार चालेल, मोठा घोटाळा करु नका, भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचे धक्कादायक विधान !

एकीकडे नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाने दुंगा असं सांगत देशातू भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचं सगळीकडे सांगत असतात. त्याच्यात यश किती आलं हा वादाचा मुद्दा असू शकतो.  मात्र मोदींच्या भ्रष्टाचाराच्या भूमिकेशी अत्यंत वेगेळी भूमिका त्यांचे नेते घेताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या भ्रष्टाचारी कारभाराचे वाभाडे काढत सत्तेवर आलेल्या भाजपचे नेते सत्ता आल्यावर मात्र वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. किमान त्यांचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांचे वक्तव्य तरी तसेच दर्शवते.

उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी ठेकेदारांना मोठा घोटाळा करु नका असं सांगत थोडाफार भ्रष्टाचार केला तरी चालेल असंच सांगितलं.  दाळीमध्ये जसं जवीसाठी मीठ टाकावे लागते त्याप्रमाणे तुम्ही चवीपुरता भ्रष्टाचार केला तरी चालेल असंही मौर्या म्हणाले. रस्ते विकासाचं खातं केशव प्रसाद मौर्या यांच्याकडे आहे. मागच्या सपा सरकारने या विभागात मोठे घोटाळे केल्याचा आरोप करत तुम्ही असे प्रकार करु नका असं सांगतानाच चवीनं खा असाच सल्ला त्यांनी ठेकेदारांना दिलाय. त्यामुळे भाजपची भ्रष्टाचाराच्या विरोधातली लडाई हीच का असा सवाल आता विचारला जात आहे.

COMMENTS