मुंबईत सिमेंटची रस्ते न बनता डांबरी रस्ते बनावेत आणि त्यांच्यावर दरवर्षी खड्डे पडावेत, असे मूठभर राजकीय नेत्यांना वाटते असा टोला नितीन गडकरींनी नाव न घेता शिवसेनेला लगावला.
सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला होणाऱ्या विरोधावरून वाशी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्वच रस्ते सिमेंटची बनवली जातील असे स्पष्ट केले. शिवाय, सिमेंट काँक्रीटने बनवलेले रस्ते 200 वर्षेसुद्धा तशीच राहतील असा दावा ही त्यांनी केला.
पुढे ते म्हणालेत,’ देशातील राष्ट्रीय मार्गासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. तसेच महामार्गावर अपघात झाल्यास आराखडा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ही करण्यात येणार असे त्यांनी स्पष्ट केले. ते वाशी येथे दोन दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या बस उत्पादकांच्या गाडय़ांच्या प्रदर्शनात बोलत होते. शिवाय देशात चांगला चालक तयार होण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन हजार क्लासेस सुरु करण्यात येणार असे सांगितले.
COMMENTS