नागपूर – उद्याच्या दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडू शकते अशी शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. मात्र शिवसेनेने सत्तेतुन बाहेर पडू नये. शिवसेनेने जरी पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असेही आठवले म्हणाले.
दसरा मेळाव्याला शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल अशी कुजबूज सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील आमदारांनी ‘मातोश्री’वर जाऊन सत्तेतून बाहेर पडू नये, अशी गळ घातली. आपण सत्तेतून बाहेर पडलो तर निवडणुकांना सामोरे जाण्याची आता कोणत्याही आमदाराची तयारी नाही. दोन-अडीच वर्षात पुन्हा निवडणुकीचा खर्च पेलवणार नाही, त्यामुळे सत्तेतून बाहेर पडू नये, अशी विनंती आमदार सुभाष साबणे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाने केली होती. आता दसरा मेळाव्याला शिवसेना नेमका कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS