पाकिस्तान आणि बांग्लादेश या शेजारी राष्ट्रांशी असलेल्या सीमा बंद करण्याचा विचार असल्याची असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीय. मध्यप्रदेशात बीएसएफच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. दशशतवाद रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय असेल असही राजनाथ सिंह म्हणाले. दहशतवाद रोखण्यासोबत बांग्लादेशातून येणा-या निर्वासितांचाही प्रश्न सुटेल असंही राजनाथसिंह म्हणाले. गृह खात्यातील सचिव, बॉर्डर सेक्युरिटी फोर्सेसचे अधिकारी, राज्यांचे मुख्य सचिव यांना याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. या सीमा सील करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते तांत्रिक सहाय्य सचिवांना करणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
COMMENTS