दहावीचा निकाल पुढील आठवडय़ात

दहावीचा निकाल पुढील आठवडय़ात

बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या  निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने अद्याप निकालाची तारीख जाहीर केली नसून पुढच्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबतच्या वेगवेगळ्या तारखा फिरत होत्या. मात्र सोशल मिडियावर फिरणाऱया तारखा अफवा आहेत. सोशल मिडियावर फिरणाऱया दहावीच्या निकालाच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याने गोंधळ दूर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेली दहावीची परीक्षा यावर्षी 17.66 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांची देखील धाकधूक वाढली असून लवकरच शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

 

COMMENTS