दहीहंडीपर्यंत न्यायालयाने नियमात बदल न केल्यास सरकार अध्यादेश काढणार

दहीहंडीपर्यंत न्यायालयाने नियमात बदल न केल्यास सरकार अध्यादेश काढणार

दहीहंडी मंडळाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष कौन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करणार आहे. दहीहंडीपर्यंत नियमात बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव, दहीहंडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुंबईचे भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

आशिष शेलार म्हणाले, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पारंपारिक सण हे साजरे होतीलच. त्यासाठी लागणा-या आवश्यक परवानगी देण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान आशिष शेलार यांनी या निर्णयानंतर शिवसेनेलाही टोला लगावला. मला सणांचे राजकारण करायचे नाही, ज्याला राजकारण करायचे आहे त्यांना शुभेच्छा, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

 

COMMENTS