दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची हजेरी

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची हजेरी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती असल्याचे समोर आले. नाशिकमध्ये 19 मे रोजी पार पडलेल्या लग्न समारंभात  पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, नाशिकमधले सर्वपक्षीय नेते, नगरसेवकही उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांना या संदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरील अडचणी निर्माण झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या लग्न समारंभाला पोलीस देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे.

 

COMMENTS