दादर स्थानकाजवळ असलेल्या चौकातील कबुतरखाना बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे सांगत मनसेने ही मागणी केली आहे.
यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना मनसेतर्फे पत्र लिहिण्यात आले आहे. कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे आजार झाल्याचे या पत्रात म्हटले आहे.
‘अनेक रहिवाशांनी त्यांना कबुतरांच्या पिसांमुळे श्वासाचे त्रास आणि अस्थमा झाल्याची तक्रार आमच्याकडे केली आहे. शहरात कबुतरांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे दादरमधील कबुतरखाना बंद करण्याची मागणी आम्ही करत आहोत’, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS