दारुपेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

दारुपेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली – महामार्गावरील दारु दुकाने, बिअर बार आणि परिमिट रुम यांच्यावरील बंदी कायम ठेवतानाच दारु पेक्षा नागरिकांचा जीव महत्वाचा असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकरालं आहे. महामार्गावरील 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने, बिअर बार आणि परिमिट रुम बंद  करण्याचा  आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यावर 500 मीटर अंतर खूप होत असल्याचं सांगत ते कमी करण्याची मागणी केंद्र सरकारने कोर्टाकडे केली होती. ती फेटाळून लावताना दारुपेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. मात्र त्याच वेळी २० हजारांहून अधिक लोकसंख्येच्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गांलगतची २२० मीटरपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या पळवाटीलाही कोर्टाची चपराक

सुप्रीम कोर्टाने महामार्गालगत 500 मीटर अतंरावरची दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने त्याचा अर्थ आपल्या सोईनुसार घेत केवळ दारुदुकानांना बंदी असल्याचे सांगत बिअर बार आणि परिमिटरुम यांना हा नियम लागू नलल्याचं म्हटलं होतं. त्याचा फायदा घेत राज्यातील 13 हजारपेक्षा अधिक बार आणिपरमीट रूम यांचे परवाने पुर्नस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयलाही सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आहे. केवळ दारुची दुकानेच नाही तर बिअरबार आणि परिमिटरुम यांनाही बंदी असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

COMMENTS