दारूमुक्त गाव, शेतमालाला हमीभाव, संभाजी ब्रिगेडचे राज्य अभियान …

दारूमुक्त गाव, शेतमालाला हमीभाव, संभाजी ब्रिगेडचे राज्य अभियान …

उस्मानाबाद – काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा, शिवसनेचे शिवसंवाद अभियान, भाजपची शिवार संवाद यात्रा यानंतर आता संभाजी ब्रिगेडनंही राज्य अभियान छेडले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 360 व्या जयंतीचं औचित्य साधून काल उस्मानाबादमधून या यात्रेला सुरूवात झाली. पथनाट्य आणि छोट्या सभांच्या माध्यमातून या अभियानाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ही यात्रा जाणार आहे. सामाजिक संघटनेचे रुपांतर एका राजकीय पक्षात झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे हे पहिलेच राज्यव्यापी अभियान आहे. गावागावामध्ये दारुमक्तीचा लढा उभारणे, शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन करणे, पक्षाची ध्ययधोरणे तळागाळात पोहचवणे आणि पक्ष संघटना बांधणी यासाठी हे अभियान सुरू केल्याचं पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी  सांगितले. या कार्यक्रमला मराठा सेवा संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रकाश धस,  उद्घाटक संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अमोल मिटकरी, अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक तथा व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदिप तांबारे, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा  कार्याध्यक्ष संतोष शिंदे,  जिजाऊ ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अॅड. मनिषा रांखूडे, संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.

COMMENTS