दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या खासदाराला अपमानास्पद वागणूक !

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या खासदाराला अपमानास्पद वागणूक !

दिल्ली – दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पुन्हा एकदा कॅन्टीनच्या मॅनेजरची मुजोरी समोर आली आहे. आता तर महाराष्ट्रातील खासदारालाच याचा फटका बसला. भाजपचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना कॅन्टीनमध्ये जागा असतानाही मॅनजरने बाहेर ताटकळत ठेवले. खासदरांसाठी असलेल्या व्हीआयपी कॅन्टीमध्ये पार्टी सुरू असल्यामुळे गायकवाडांना तिथे बसण्यास मज्जाव करण्यात आला. टेबल खाली असतानाही त्यांना तिथे जाण्यास मनाई करण्यात आली. खासदार असले म्हणून काय झाले त्यांना तिथे प्रवेश देता येणार नाही अशी भाषा कॅन्टीनच्या मॅनेजरने वापरली. दरम्यान या प्रकरणाची तक्रार खासदार सुनील गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कॅन्टीनच्या मॅनेजरला काढून टाकण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

COMMENTS