दिवाळीत भारनियमन होणार नाही –   ऊर्जामंत्री

दिवाळीत भारनियमन होणार नाही – ऊर्जामंत्री

नागपूर – राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला असला, तरी मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून1200 मेगावॅट वीज घेण्यात येणार आहे. असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे.  

‘राज्यात सध्या विजेचा तुटवडा असला तरी मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागात केले जाणार आहे. ते ही तात्पुरते असून, दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी पुरेसा कोळसा राखून ठेवण्यात आला आहे. येत्या 15 दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल, असे ते म्हणाले.

‘विजेची तूट निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात भारनियमन करण्याची वेळ आली. मात्र, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी.’असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले.

COMMENTS