शेतकऱ्यांना दीड लाखांपर्य़ंत सरसकट कर्जमाफी – मुख्यमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांना दीड लाखांपर्य़ंत सरसकट कर्जमाफी – मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्याचा 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एकूण कर्जमाफीची व्याप्ती बघितली तर घरटी कर्ज महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे.  आधीच्या कर्जमाफीचा आढावा घेतला. केंद्राने याआधी जी 72 हजार कोटी कर्जमाफी केली ती नंतर 52 हजार ची झाली. राज्याने याआधी 7 हजार कोटीची केली होती. जवळपास 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी निर्णय घेतला आहे. दीड लाख कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 90 टक्के थकीत कर्ज असलेल्या शेतकरी यांचा सातबारा कोरा होत आहे.

पुंर्गगठित शेतकरी यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. एकुण 40 लाख शेतकरी यांची कर्ज माफ होणार आहे. जे नियमित कर्ज भरत आहेत, त्यांच्यासाठीही योजना केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के प्रोत्साहन पर अनुदान देणार. राज्यातील 89 लाख शेतकरी यांना 34 हजार कोटी रुपयांची मदत होत आहे. याचा सरकारवर भार पडणार आहे, यामुळे इतर कामे कमी होणार आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांचे आभार मानतो. भारतीय किसान संघाने मोलाची मदत केली. यांच्यापेक्षा जास्त बोझा सरकार उचलू शकत नाही, देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे.  ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे.  30 जून 2016 ही कट ऑफ डेट राहील. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

 

COMMENTS