केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे.
केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील विविध शहरांची यादी आज (गुरुवारी) जाहीर केली. यामध्ये पहिल्या स्थानवर मध्यप्रदेशातील इंदूर शहर असून अनुक्रमे भोपाळ, विझाग, सुरत, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती आणि बडोदा या शहरांचा टॉप टेनच्या यादीत समावेश आहे.
देशातील टॉप टेन स्वच्छ शहरं
1 . इंदौर – मध्य प्रदेश
2 . भोपाळ – मध्य प्रदेश
3 . विशाखापट्टणम – आंध्र प्रदेश
4 . सुरत – गुजरात
5 . म्हैसूर – कर्नाटक
6. तिरुचिरापल्ली – तामिळनाडू
7. नवी दिल्ली
8. नवी मुंबई – महाराष्ट्र
9. तिरुपती – आंध्र प्रदेश
10. बडोदा- गुजरात
COMMENTS