धनंजय मुंडे यांचीही ‘सेल्फी विथ खड्डे’

धनंजय मुंडे यांचीही ‘सेल्फी विथ खड्डे’

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात ‘सेल्फी विथ खड्डे’ ही मोहीम उघडली आहे. यावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरात ट्विटरवाद रंगला आहे. या वादात आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. अंबेजोगाई ते अहमदपूर या रस्त्यावर फिरत असताना खड्डयांसोबत सेल्फी काढून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरद्वारे पाठवल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेल्या सेल्फी विथ खड्डेच्या मोहिमेमुळे मंत्री चंद्रकांत पाटील हवालदिल झाले असून त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले आहे. मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली माती, मुरूम  टाकण्याचे प्रकार सुरू असून त्या विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठी मोहीम उघडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली.

COMMENTS