धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाचे बांधव गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. परंतु, त्याकडे शासनकर्ते दुर्लक्ष करीत असल्याने, यशवंत सेनेतर्फे 1 आॅगस्ट रोजी मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक यांनी सांगितले.
व्यंकटराव नाईक म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समाजाचा अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. आघाडी आणि युती सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीपुर्वी भारतीय जनता पक्षातर्फे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन वर्ष झाली तरीही अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. परिणामी समाजाची सर्वच क्षेत्रांमध्ये अधोगती सुरु आहे. त्यासाठी झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी 1 आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय यशवंत सेनेतर्फे घेण्यात आला.
COMMENTS