नरेंद्र मोदींचे 5 एकर जागेवर भव्य मंदिर होणार, 23 ऑक्टोबरला भूमीपूजन !

नरेंद्र मोदींचे 5 एकर जागेवर भव्य मंदिर होणार, 23 ऑक्टोबरला भूमीपूजन !

मेरठ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जसे मोठ्या प्रमाणात विरोधक आहेत तसाच त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे. जसे कट्टर विरोधक आहेत तसेच निस्सीम भक्तही आहेत. अशाच एका भक्ताने आता मोदी यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतलाय. मेरठमधील सरधना या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात येणार आहे. सरधाना मतदारसंघाचे भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ही घोषणा केलीय. येत्या 23 ऑक्टोबरला या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

या मंदिरासाठी सरधना या ठिकाणी पाच एकर जमीन विकत घेण्यात आली आहे. या जागेत मोदींचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. मंदिरामध्ये 100 फूट उंचीचा मोदींचा पुतळा असेल. हे मंदिर 2 वर्षात बांधून तयार होणार आहे. यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. चाहत्यांच्या देणगीतून ही मदत गोळा केली जाणार आहे.

मोदींचं याआधीच 2015 मध्ये राजकोटमध्ये मंदिर उभारण्यात आलं आहे. त्या ठिकाणी त्यांचे चाहते नियमितपणे भेट देतात. एका ट्रस्टच्या माध्यमातून ते मंदिराची देखभाल केली जात आहे. यापूर्वी तेलंगाणामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे त्यांच्या समर्थकाने मंदिर उभारले आहे. तसंच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांचे मंदिर आहे.

मंदिर बांधणे हे काहींच्या श्रेद्धेचा विषय असू शकतो. मात्र केवळ मंदिर बांधून देवपण येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे जनतेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे आणि त्यातून लोकांच्या मनावर राज्य करणे हेच लोकशाहीमध्ये अपेक्षीत आहे. हे मोदींसह सर्वच नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

COMMENTS