नवी मुंबईतील खारघर येथे १३२ हेक्टर जागेवर ‘नवी मुंबई कॉर्पोरेट पार्क’ या नावाने बीकेसीच्या धर्तीवर व्यावसायिक संकुल उभाण्यात येणर आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सिडको संचालक मंडळाने गेल्या वर्षी मंजूर केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नवी मुंबईत स्मार्ट बीकेसी उभारण्याबाबतचा तारांकित प्रश्न सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, हेमंत टकले, अनिल भोसले यांनी विचारला होता. त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकल्पाबाबत नुकतीच जाहिरात देऊन सल्लागारांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
COMMENTS