नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली

 

नवी मुंबई – नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची महापालिका आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलीय. त्यांच्या जागा एस रामास्वामी हे आता नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पहातील. अवैध बांधकामाबाबत मुंडे यांनी उच्च न्यायालयात राज्य सरकारविरोधात मांडलेली भूमिका मुंडे यांना भोवल्याचं बोललं जातंय. तसंच राजकीय दबावामुळेही त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. विविध निर्णयावरुन त्यांची आणि नगरसेवाकांची वादावादी झाली होती.

पनवेलमध्ये अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात धडक कारवाई करणारे आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्या विरोधात पनवेलमध्ये नागरिकांमध्ये रोष आहे. सोमवारी या निर्णया विरोधात पनवेलमध्ये रॅली काढण्यात येणार आहे. आणि आता नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्येही पुन्हा नागरिकांचा रोष पाहायला मिळू शकतो…

COMMENTS