नवी दिल्ली – नोटाबंदी हा एक ‘फ्लॉप शो’ असल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी केली आहे. त्यांनी याची तुलना इंदिरा गांधींनी राबवलेल्या ‘नसबंदी’ अभियानाशी केली आहे. 1977 मध्ये इंदिरा गांधींनी लागू केलेल्या नसबंदीमुळे त्यांचा दारूण पराभव झाला होता. तसाच भाजप 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नोटबंदी अपयशी ठरल्याचे तृणमूल काँग्रेसने सुरूवातीलाच म्हटले होते, असे वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले. नोटाबंदीने जनता त्रस्त झाली असून याचीच किंमत भाजपला पुढील निवडणुकीत फेडावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटल आहे.
COMMENTS