नांदेड – नांदेडमधील 81 जागांपैकी 61 जागांचे कल आणि निकाल हाती आले आहेत. त्यापैकी तब्बल 58 ठिकाणी काँग्रेसनं आघाडी किंवा विजय मिळवला आहे. या 58 जांगापैकी काँग्रेसनं आतापर्य़ंत 35 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 2 आणि शिवसेनेला एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादी आणि एमआयएमला अजूनतरी एकही जागा मिळाली नाही. निकालाचे असेच ट्रेंड राहिल्यास काँग्रेस 70 जागांच्या पुढे जाऊ शकतो अशी सध्याची स्थिती आहे. नांदेडकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवल्याचं दिसून येतंय.
COMMENTS