नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाची 10 महत्वाची कारणे आणि वैशिष्ट्य !

नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाची 10 महत्वाची कारणे आणि वैशिष्ट्य !

 

  • शिवसेना – भाजप यांच्या मतभिवागणीचा फायदा ब-याच प्रमाणात फायदा काँग्रेसला झाला. तसा अंदाज आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी प्रचारादरम्यान शिवसेना म्हणज्ये भाजपची बी टीम असल्याचं सांगत शिवसेनेला मतदान म्हणज्ये काँग्रेसला मतदान असं वक्तव्य केलं होतं.
  • या मतविभागणीमुळे ज्या हिंदू बहुल भागातून काँग्रेला कधीही फारस यश मिळालं नाही त्या ठिकाणीही काँग्रेसचे उमेदवार निवडूण आले.
  • एमआयएम डाऊन झाल्याचा फायदा काँग्रेसला झाला. गेल्यावेळी 11 जागा जिंकलेल्या एमआयएमला यंदा एकही जागा जिंकता आली नाही. त्यांच्या प्रदेशाध्यक्षलाही पराभवाला सामोरं जावं लागलं.
  • एमआयएमला मतदान केल्याने भाजपचा फायदा होतो हे मुस्लिम मतदारांनी हेरलं आणि त्यामुळे एकगट्ठा काँग्रेसला मतदान केलं.
  • भाजपला स्थानिक नेता नेता नव्हता. लातूरच्या संभाजी पाटील निलंगेकरांना नांदेडच्या मैदानात उतरवं होतं. मात्र स्थानिक पातळीवर लातूर नांदेड हा संघर्ष सातत्याने सुरू असतो. त्यामुळे नांदेडची सूत्र लातूरच्या हाती नको अशी भूमिका नांदेडकरांनी घेतल्याचं दिसून येतंय. काँग्रेसतर्फे तसा प्रचारही करण्यात आला. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला.
  • भाजपकडे स्थानिक मोठा नेता नाही. त्यामुळे भाजपनं शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे निवडणुकीची संपूर्ण सूत्र हाती दिली. तांत्रिकदृष्ट्या चिखलीकर अजूनही शिवसेनेत आहेत. असा अभद्र प्रकार नांदेडकरांना आवडला नाही.
  • भाजपचे स्थानिक नेते म्हणून ओमप्रकाश पोकर्णा आणि माजी खासदार भासकराव खतगावर हे होते. पण ते कधीच लोकनेते राहिले नाहीत. प्रत्येकवेळी अशोक चव्हाणांच्या मदतीने आमदार किंवा खासदार झाले होते. त्यामुळे त्यांना नेते म्हणून आणि त्यांच्याकडे कारभार देण्यास नांदेडकरांनी पूर्णपणे नकार दर्शवला.
  • त्यातच मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर वैयक्तीक जोरदार टीका केली. तीही नांदेडकरांना अजिबात आवडली नाही. उलट त्याची सहानभूती अशोक चव्हाणांना मिळाली. शहराचा विकास करयाचा असेल तर इतरांपेक्षा अशोकरावच बरे आहेत अशी भावना नांदेडकरांची झाली. त्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला.
  • काँग्रेसच्या मावळत्या महापौर शैलजा स्वमी 3 हजार मतांनी विजयी. त्यांचे पती किशोर स्वामी 4 हजार मतांनी विजयी.
  • ऐकेकाळचे अशोक चव्हाण यांचे उजवे हात जमजले जाणारे काही दिवसांपूर्वी भाजपवासी झालेले माजी आदमदार ओपप्रकाश पोकर्णा यांच्या मुलाचाही दारुण पराभव झाला.

COMMENTS