नांदेड – राज्यातील आज अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक पवित्रा घेत दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून संप सुरुच ठेवला आहे. नांदेडमध्ये संपला हिंसक वळण लागले असून आंदोलन करणाऱ्या 15 शेतकऱ्यांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यामुळे हा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यातील मालेगाव मार्गावरील देगाव येथील संतप्त शेतकरी रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकत असताना त्या ठिकाणी आलेल्या अर्धापूर पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल करत अटक केली. शेतकरी संपाचा आज चौथा दिवस असून सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केल्याने अनेक ठिकाणी या संपाचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
COMMENTS