नांदेड महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी व्ही व्ही पॅट मशीन पडले बंद !

नांदेड महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी व्ही व्ही पॅट मशीन पडले बंद !

नांदेड – नांदेड वाघाला महापालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागांसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात झालीय. आतापर्यंत मतदान शांततेत सुरू आहे. या निवडणुकीमध्ये प्रायोगिक तत्वावर काही प्रभागांमधील काही मतदान केंद्रांवर व्ही व्ही पॅट मशीनचा वापर केला जात आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील 37 मतदान केंद्रांवर हा प्रयोग केला जात आहे. मात्र त्यापैकी 6 मतदान केंद्रावरील हे मशीन बंद पडले. त्या ठिकाणी दुसरे व्ही व्ही पॅट मशीन बसवण्याचा प्रय़त्न करण्यात आला. मात्र त्यामध्ये यश आलं नाही. त्यासाठी तब्बल 2 तास मतदान प्रक्रिया बंद होती. दोन तासानंतर व्ही व्ही पॅट मशीन बंद करुन ईव्हीएम मशीनवर मतदान सुरू करण्यात आले. मतदान प्रक्रियेबाबतचा संशय रोखण्यासाठी या मशीलनचा वापर केला जातोय. मात्र एका महापालिकेतील मतदानात असा अनुभव असेल तर देशभरात याची अंमलबजावणी  कशी होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

COMMENTS