नांदेड – मनपाच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या तीन आणि एनसीपीच्या एका नगरसेवकाचा यात समावेश आहे. हे चारही नगरसेवक भाजपात जाणार असून आतापर्यंत एकूण 16 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. राजीनामे दिलेले नगरसेवक भाजपकडून निवडणूक लढनार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नांदेड वाघाळा महापालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 12 ऑक्टोबरला होणार आहे. आजपासून तिथे आचारसंहिता लागू झाली.
COMMENTS