मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघला नोटीस बजावली आहे. नागपूर महानगरपालिकेने पालिकेच्या तिजोरीतून संघाच्या स्मृती मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव महापालिकेने मंजूरही केला. त्यामुळे स्मृती मंदिरात संरक्षक भिंत बांधणे आणि इतर आवश्यक कामांसाठी एक कोटी 37 लाखांचा निधी महापालिकेकडून दिला जाणार आहे.
रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसराभोवती संरक्षण भिंत व आतील भागात सिमेंट रस्ते बांधकामप्रकरणी नागरी हक्क संरक्षण मंचाचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत 37 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विकासकामांना विरोध दर्शविण्यात आला आहे. याप्रकरणी संघाचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी, नागपूर महा नगर पालिकेचे आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष यांना नोटीस बजावली असून 3 आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
COMMENTS